Krushnawedh - कृष्णवेध

Type
Book
Authors
Category
 
Pages
269 
Description
कावळ्यांनी वेढलेली राधिका झांजावून खालते कोसळली होती. तो धुरानं वेढलेलं वन तिला दिसलं. भयचकित होऊन ती उठली, तों तिला ज्वाळा दिसल्या. आपल्या जीवींचा जीव आगींत सांपडला, हे ध्यानीं येतांच तशीच धडपडत ती निघाली.''माझं गोजिरवाण- माझं वाल्हंदुल्हं- करूं तरी काय-" असा स्फुंद प्रगटवीत ती वनाच्या दिशेनं धावू लागली. भंवताले धूर कोंदला.प्राण घुसमटला. श्वास रुंधला आणि हात छातीशी घेतलेली क्षीण राधिका पालथी कोसळली. धावत हीं सगळी तिजपास पोंचली."घोळ करू नका. वर येऊ द्या- सगळे बाजूस सरा- दूर व्हा!"यशोदेनं खाली बसून तीच मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, ती पुटपुटली, ''आहे- क्षीण श्वास चालतो आहे- पाणी हवं आहे-"प्रत्येक शब्दाशब्दाला वाचकाची उत्कंठा वाढवणारं असं हे पुस्तक, गो. नी. दांडेकर यांनी उत्तम रित्या शब्दबद्ध केले आहे. 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.