Purwrang - पूर्वरंग

Type
Book
Authors
 
Category
 
Publisher
Pages
287 
Description
१९६३ साली ‘पूर्वरंग’ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. आणि आता श्रीविद्या प्रकाशनतर्फे तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. तिसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने माझे हे पुस्तक वाचताना वाटले की पुन्हा एकदा ह्या देशांतून हिंडून यावे. ज्या स्थळांची मनावर त्या काळी उमटलेली चित्रे आजही ताजी आहेत ती स्थळे पुन्हा एकदा पाहून यावे. पण असेही वाटले की न जाणो मनावर उमटलेली त्या काळातली चित्रे आणि बदललेल्या परिस्थितीत आज ती ठिकाणे ज्या स्वरूपात उभी आहेत ती चित्रे जर एकमेकांशी जुळली नाहीत तर उगीचच खंत वाटेल. ती ठिकाणे बदलली तसा गेल्या पंधरा-सोळा वर्षांच्या काळात मीही बदललो असणार. आज ही ठिकाणे पाहणार्‍यांना माझ्या पुस्तकातून येणारा प्रत्यय प्रत्यक्षात येणारही नाही कदाचित ! पण त्याला इलाज नसतो. म्हणून त्या काळी पाहिलेले ते ते देश, ती ती स्थळे आणि तिथे भेटलेली माणसे ह्या पुस्तकात तशीच राहू देणे चांगले असे मला वाटते. असो.ह्या नव्या आवृत्तीचे प्रकाशक श्री. मधुकाका कुलकर्णी यांचा मी आभारी आहे.~ पु. ल. देशपांडे 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.