Raja Ravi Varma - राजा रवि वर्मा

Type
Book
Authors
 
Category
 
Publisher
Pages
300 
Description
आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काहीही लिहिलेले नाही. मानवी जीवनाला सांस्कृतिक, भावननिक समृद्धतेकडे घेऊन जाणार्‍या विविध कलांचे महत्त्व महान कलाकारांनीच सिद्ध केलेले असते. जीवनात येणार्‍या सुख दु:ख, मान अपमानाला सामोरे जातानाही या कलावंतांची दृष्टी आणि अभिव्यक्ती कलात्मकतेचे दर्शन घडवते.भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावणार्‍या थोर चित्रकाराच्या जीवनाचे कलात्मक व भावात्मक दर्शन ही कादंबरी घडवते. काव्यमय भाषाशैली आणि नाट्यपूर्ण अभिव्यक्ती ही देसाईंची लेखन वैशिष्ट्ये."राजा रविवर्मा’ मध्ये रणजित देसाईंमधल्या "कलावंताचे’ आणि "माणसाचे’ उत्स्फूर्तपण मधूनमधून कारंजासारखे उसळताना आढळते. माणसाला कलेची भूक का लागते ? जीवन आणि कला यांचा संबंध कोणत्या प्रकाराचा असतो ? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ वाचकाच्या मनात उठतं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाचकाला मिळतो. 
Number of Copies

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.